मुंबई, दि.२२ : अजय मगरे
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आंबेडकर यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
महिन्याभरापूर्वीच शिवसेना आणि रिपब्लिकन सेना युतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर प्रथमच दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीत जिल्हास्तरावर समन्वय साधणे, प्रभावी धोरण आखणे आणि कार्यकर्त्यांपर्यंत युतीचा योग्य संदेश पोहोचवणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान आंबेडकर आणि शिंदे यांच्यासोबत रिपब्लिकन सेनेचे तसेच शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारीही उपस्थित होते.
या बैठकीमुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-रिपब्लिकन सेना युती अधिक प्रभावीपणे सक्रिय होणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.




















