Homeताज्या बातम्याकाशी समान पुण्यभूमीची दुर्दशा : पुणतांबा यात्रेत भाविकांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष.....

काशी समान पुण्यभूमीची दुर्दशा : पुणतांबा यात्रेत भाविकांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष…..

कोपरगांव, दि.२२ : दिलीप गायकवाड

कोपरगांव व राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे आषाढ महिन्यातील कामिका एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी श्री श्रेष्ठ संत योगिराज चांगदेव महाराजांच्या समाधी स्थळावर दर्शनासाठी गर्दी केली. मात्र, यात्रेसाठी कोणतेही पुरेसे नियोजन नसल्यामुळे भाविकांचे हाल झाले. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी, रेल्वे रुळावरून धोकादायक पद्धतीने ये-जा करणारे लोक, पिण्याच्या पाण्याचा अभाव, उपवासाची अन्नव्यवस्था नसणे, लाऊडस्पीकरवर केवळ दान मागणाऱ्या घोषणा आणि कुठेही पोलीस अथवा प्रशासनाचा ठसा न दिसणे अशी परिस्थिती होती.

आषाढी एकादशीनिमित्त पुणतांबा हे नेहमीच वारकरी संप्रदायासाठी श्रद्धास्थान राहिले आहे. आजच्या दिवशी कोपरगांव, राहाता, श्रीरामपूर, येवला आदी तालुक्यांतून हजारो भाविक येथे दाखल झाले होते. दुपारनंतर गर्दी शिगेला पोहोचली. मात्र, पुरेशा पोलीस बंदोबस्ताअभावी रस्त्यावर वाहतुकीचा विस्कळीत कारभार दिसून आला. रेल्वे रुळ धोकादायक पद्धतीने लोक ओलांडत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता.

मंदिर परिसरात उपवासाच्या पदार्थांची तसेच साध्या पिण्याच्या पाण्याचीही कुठलीही सोय नव्हती. काही भाविक थोडीफार अन्नधान्य वाटताना दिसले तरी प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था नव्हती. मंदिराभोवती बॅनरबाजी, नेत्यांचे प्रचार बोर्ड लागलेले होते, मात्र भाविकांच्या गरजा कोणाच्या लक्षात आल्या नाहीत.

शिर्डीच्या तुलनेत पुणतांबा हे जागृत तीर्थक्षेत्र असूनही येथे अद्याप मूलभूत सुविधा पोहोचल्या नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘काशी समान पुण्यभूमी’ मानल्या जाणाऱ्या पुणतांब्याची अशी दुरवस्था पाहून अनेक भाविक नाराजी व्यक्त करत होते. येथेच कार्तिकस्वामींचे ज्योतिर्लिंग मंदिर, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या उपस्थितीत पार पडलेला सामिधा सोहळा आणि साईबाबांचे पाय लागलेली जागा असूनही शिर्डीच्या धर्तीवर येथे काहीच सुधारणा झाल्या नाहीत, याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यापुढील यात्रांसाठी योग्य नियोजन करावे, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा बहुजन शक्ती संस्थेकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

error: Content is protected !!