काँग्रेस किसान सेलचे विजय जाधव यांचा आक्षेप
कोपरगाव,दि.२१ : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील संरक्षणभिंत कोणाच्यापरवानगीशिवाय तोडण्यात आली असून, त्या संरक्षण भिंतीवर बांधकाम सुरू आहे.आणि खाजगीतील बांधकाम धारकारक येथील कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान परीसरात बांधकाम साहित्य व ठेवले आहे हे सर्व कोणाच्या परवानगीने होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस किसान सेल्सचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव यांनी केला आहे.
यासंदर्भात जाधव यांनी कोपरगाव सहाय्यक निबंधक कार्यालय अधिकारी, पुणे येथील पणन कार्यालय तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर यांच्याकडे चौकशीचे निवेदन दिले आहे.
जाधव यांनी सांगितले की, “पश्चिम बाजूस महेंद्र ठक्कर यांना ये-जा सुलभ व्हावी म्हणून संरक्षणभिंत तोडून गेट उभारण्यात आले आहे. हे सर्व काम कोणाच्या परवानगीने झाले याची चौकशी झाली पाहिजे. अन्यथा आम्हाला आंदोलनाच्या भूमिकेत जावे लागेल.”
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या कारवाईवर शेतकरी व नागरिकांमध्येही चर्चा सुरू असून, संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.




















