Homeताज्या बातम्याखेर्डा तांड्यात महावितरणचे वाकलेले वीज पोल धोकादायक; तातडीने दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी

खेर्डा तांड्यात महावितरणचे वाकलेले वीज पोल धोकादायक; तातडीने दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी

वादळी वाऱ्यानंतर अनेक ठिकाणी वीज पोल झुकले; जिवितहानीची भीती

दावरवाडी, दि.२८  (प्रतिनिधी )

पैठण तालुक्यातील दावरवाडी गटातील खेर्डा तांडा येथे महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या अनेक पोलांची अवस्था धोकादायक बनली आहे. मागील पंधरवड्यात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक पोल झुकले असून, महावितरणने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.
खेर्डा तांड्यास बालानगर महावितरण कार्यालयातून वीजपुरवठा केला जातो. गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तसेच मोती तांड्याकडे जाणाऱ्या मुख्य लाईनवरील अनेक पोल झुकल्याचे दिसून येत आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पोलही मोठ्या प्रमाणात कलंडले आहेत.

गंगुबाई सूर्यभान पांगरे (गट नं. ७१/१), अंकुश शामा राठोड, कृष्णा शंकर राठोड, शंकर शामा राठोड (गट नं. ७२), रामधन तुकाराम राठोड व चंद्रकला कल्याण राठोड (गट नं. ७३) यांच्या शेतातील पोल धोकादायकरीत्या झुकले आहेत. तसेच मजित कडुभाई पठाण (गट नं. ५५/१) व नांन्हुसिंग सकरू जाधव (गट नं. ५५/२) यांच्या शेतातील थ्री-फेज लाईनचे पोलही झुकलेल्या अवस्थेत आहेत.
पावसाळ्यात पुन्हा जोरदार वारे व पाऊस झाल्यास हे पोल कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया :

“वादळी वाऱ्यामुळे झुकलेले वीज पोल महावितरणने तात्काळ दुरुस्त करावेत. भविष्यात जोरदार पाऊस व वादळात हे पोल कोसळल्यास शेतकरी व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.”
— कैलास जाधव

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!