छत्रपती संभाजीनगर,दि.२९.( प्रतिनिधी )
प्राथमिक आरोग्य केंद्र निलजगाव अंतर्गत उपकेंद्र बोकुड जळगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम डॉ. भूषण आगाज, डॉ. महेश जाधव आणि डॉ. किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी विकास कर्पकांडे, प्रफुल ताकवाले, आरोग्य निरीक्षक सुनील जाधव, पद्माकर सागरे तसेच आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा सेविका व मदतनीस यांनी सक्रिय सहभाग घेतला. बोकुड जळगाव व चितेगाव येथील ग्रामस्थांनीही मोहिमेस मोलाचे सहकार्य केले.
या मोहिमेद्वारे गावातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात येत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बालकांना पोलिओमुक्त आणि निरोगी भविष्य देण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे.




















