कोपरगाव, दि. ७ (चंद्रकांत जोर्वेकर )
कोपरगाव तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ पत्रकार व निर्भीड लेखणीचे धनी बिपीनदादा गायकवाड यांचे दि. ४ मार्च २०२५ रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र माझा, गर्जनारी लेखणी यांसारख्या माध्यमांद्वारे त्यांनी अनेक वर्षे समाजातील प्रश्नांवर निर्भीडपणे लेखणी चालवली. स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे ते पत्रकारिता क्षेत्रात एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या अचानक जाण्याने कोपरगाव तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांची उणीव कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र शोककळा पसरली.
ज्येष्ठ पत्रकार बिपीनदादा गायकवाड यांना बहुजन शक्ती सामाजिक संस्था, प्रज्ञा फाऊंडेशन तसेच बहुजन शक्ती न्यूज पोर्टल चॅनेलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.




















