ठाणे, दि. १९ : ( अजय मगरे )
ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ही सुट्टी सर्व अंगणवाडी केंद्रे, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा तसेच महाविद्यालये यांना लागू राहणार आहे. याशिवाय आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांनाही ही सुट्टी लागू राहील, अशी अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे.




















