ठाणे, दि. ४ : ( अजय मगरे )
आगामी ठाणे महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाने जाहीर केली आहे. यामुळे आता उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मतदारांमध्ये उत्सुकता आणि चर्चांना ऊत आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, या अंतिम प्रभाग रचनेत काही प्रभागांचे सीमारेषांमध्ये बदल करण्यात आले असून, आरक्षणाचे प्रमाण कायम ठेवण्यात आले आहे. मागील प्राथमिक आराखड्याविरोधात नागरिकांनी केलेल्या आक्षेप, सूचना विचारात घेऊन हा अंतिम आराखडा ठरविण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिकेतील एकूण प्रभागांची संख्या पूर्ववत ठेवण्यात आली असून, काही प्रभागांचे विलिनीकरण व विभागणी करून मतदारसंख्या संतुलित करण्यात आली आहे. या नव्या रचनेनुसारच आगामी सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत.
अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच, विविध राजकीय पक्षांच्या गोटात तयारीला वेग आला असून, इच्छुक उमेदवारांनी आपले गणित मांडण्यास सुरुवात केली आहे




















