ठाणे,दि.१९. ( अजय मगरे )
ठाणे शहरातील समाज बांधवांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक दिनांक २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता टाऊन हॉल, ठाणे येथे पार पडणार असून, शहरातील सर्व मान्यवर, पदाधिकारी व समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जयंती उत्सव अधिक भव्य व संघटित पद्धतीने साजरा करण्यासाठी या बैठकीत विविध विषयांवर विचार विनिमय होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
शिव शाहू फुले डॉ. आंबेडकर अनुयायी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नियोजन समिती, ठाणे यांच्या वतीने आयोजित या बैठकीस सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी केले आहे.



















