पैठण, दि.२३ ( प्रतिनिधी )
पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील न्यु हाईस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची माजी विद्यार्थीनी कु. ऋतुजा प्रबुद्ध इंगळे हिची आयसीआयसीआय बँकेत डिप्युटी मॅनेजर पदावर नुकतीच निवड झाली आहे. तसेच या शाळेचेच माजी विद्यार्थी राम भास्कर पुदाट यांची पोलीस अंमलदार पदावर यशस्वी पदोन्नती झाली आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष शामदादा तांगडे, सदस्य वाघमोडे सर, बद्रिनाथ (काका) थोटे, शिवाजीदादा तांगडे, सुनिल इंगळे, युसूफ शेख सर, तसेच मुख्याध्यापक एस.एस. गोजरे, पर्यवेक्षक डी.एम. खेमनर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















