Homeताज्या बातम्यानवीन वर्षानिमित्त दावरवाडी गावकऱ्यांसाठी अनोखी भेट..

नवीन वर्षानिमित्त दावरवाडी गावकऱ्यांसाठी अनोखी भेट..

किशोर अशोकराव तांगडे यांच्या पुढाकाराने ५० वर्षांनंतर एकादशीला एस.टी. बस सुरू; भागवत एकादशीनिमित्त मोफत प्रवास**

दावरवाडी,दि.३१.( अभिजीत सोनवणे )

नवीन वर्षाच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर दावरवाडी गावकऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर अशोकराव तांगडे यांनी एक अनोखी व ऐतिहासिक भेट दिली आहे. तब्बल ५० वर्षांनंतर दावरवाडी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे प्रत्येक एकादशी दिवशी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस सेवा सुरू करण्यात आली असून, या निर्णयामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या ऐतिहासिक निर्णयाच्या निमित्ताने मी पैठणकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोर (भाऊ) अशोकराव तांगडे यांच्या वतीने भागवत एकादशीचे औचित्य साधत दावरवाडी ते श्रीक्षेत्र पैठण या मार्गावर दिवसभरासाठी सर्व भाविकांसाठी एस.टी. महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

सकाळी ठीक ८.३० वाजता दावरवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात तब्बल पन्नास वर्षांनंतर बस पोहोचताच गावातील नागरिकांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला व समाधान व्यक्त केले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने एस.टी. महामंडळाच्या चालक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पहिल्या बसचा शुभारंभ गावातील एका वारकरी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. तसेच महिलांनी बसचे विधीवत पूजन केले. पहिल्याच बसमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला, ही बाब विशेष ठरली.

महामंडळाच्या वतीने दुसरी बस साडेअकरा वाजता पैठणहून निघणार असल्याची सूचना यावेळी देण्यात आली. त्यामुळे अधिक भाविकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

दावरवाडी गावात एस.टी. बस येण्यासाठी मी पैठणकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोर (भाऊ) अशोकराव तांगडे यांनी मागील काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. विभागीय नियंत्रक व संबंधित अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेऊन ग्रामस्थांच्या अडचणी मांडण्यात आल्या. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून, आज संपूर्ण गावाने मोठ्या उत्साहाने बसचे स्वागत केले.

या निर्णयामुळे दावरवाडी व पंचक्रोशीतील भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

किशोर (भाऊ) अशोकराव तांगडे यांची प्रतिक्रिया :

“दावरवाडी गावकऱ्यांची ही मागणी गेली तब्बल पन्नास वर्षांची होती. आज जेव्हा बस थेट गावाच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात येताना पाहिली, तेव्हा मन भरून आलं. हा क्षण केवळ माझ्यासाठी नाही, तर प्रत्येक दावरवाडीकरासाठी अभिमानाचा आहे.

भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अनेक वेळा बैठका, निवेदने, प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती दिल्यानंतर अखेर हा निर्णय झाला, याचे मनापासून समाधान आहे.

भागवत एकादशीच्या दिवशी दावरवाडी ते श्रीक्षेत्र पैठण हा मोफत प्रवास सुरू करता आला, हे मी माझे सौभाग्य समजतो. ही सेवा कोणत्याही एका व्यक्तीची नसून, संपूर्ण गावाच्या एकजुटीची आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या गरजांची दखल घेत सकारात्मक निर्णय घेतला, त्याबद्दल मी महामंडळ व सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानतो.

पुढील काळातही दावरवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांच्या प्रश्नांसाठी अशीच प्रामाणिकपणे लढत राहीन, ही ग्वाही देतो.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!