पैठण, दि.६. ( अभिजित सोनवणे )
पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने खास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील बाल वारकरी विठ्ठल-रुक्मिणी आणि पारंपरिक वारकरी वेशभूषेत सजून गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात दिंडी काढण्यात आली.
विद्यार्थ्यांनी ‘माऊली माऊली’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात परिसरात अध्यात्मिक उर्जा निर्माण केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते मित्रवर्धन रविंद्र काळे, सरपंच विजय गायकवाड, उपसरपंच आसमान दादा काळे, माजी उपसरपंच रेवणनाथ कर्डीले, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण काळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लखन भावले आदी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. आत्माराम गोर्डे, शिक्षक अशोक बुद्धार, सौ. गायकवाड मॅडम, श्रीमती हंडाळ मॅडम, श्रीमती आयनुले मॅडम, श्रीमती सोनटक्के मॅडम, श्रीमती चाबुकस्वार मॅडम, श्रीमती जया शिंदे, गोर्डे सर, गायकवाड सर, बुधनर सर, भालसिंग सर यांच्यासह ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारी परंपरेचा अनुभव मिळाला असून, गावकरी व पालक वर्गाने या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.




















