Homeताज्या बातम्यानियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय द्या; आशुतोषदादा काळे यांची मागणी

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय द्या; आशुतोषदादा काळे यांची मागणी

कोपरगाव : दि. २५ ,दिलीप गायकवाड

राज्यातील शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफीची अत्यंत गरज असून कर्जमाफी करताना थकीत कर्जदारांसोबत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा, अशी मागणी आमदार आशुतोषदादा काळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आर्थिक सल्लागार तथा शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष प्रविणजी परदेशी यांना निवेदन सादर केले.

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत अभ्यास करण्यासाठी समिती नेमली असून समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडतानाच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, असे काळे यांनी स्पष्ट केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळत नसल्याने त्यांच्या मनात

अन्यायाची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे शासनाने थकीत कर्जदारांना जेवढी कर्जमाफी दिली जाईल, तेवढ्याच रकमेचे प्रोत्साहनपर अनुदान नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही देण्यात यावे, अशी स्पष्ट नोंद समितीच्या अहवालात करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

शेतकऱ्यांमध्ये समतोल व न्यायाची भावना निर्माण होण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचेही काळे यांनी निवेदनात म्हटल आहे.याबाबत सुनिल गाडे चासनळी कोपरगांव यांनी बहुजन शक्ती न्युज कडे माहिती दिली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!