पैठण, दि.२६.( अभिजीत सोनवणे )
शनिवारी दि.२५ रोजी पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील न्यु हायस्कूल माध्यमिक विद्यालय शाळेत सन २०१०/११* चे इयत्ता दहावीच्या वर्गातील शाळेचे माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा *स्नेहमिलन मेळावा* विद्यालयात अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
यावेळी मुख्याध्यापक सुदाम गोजरे, माजी मुख्याध्यापक दिलीप आचारी,झिरपे सर,सहशिक्षक श्री.झारगड सर,श्री.खवळे सर,श्री.बांदल सर,श्री.मुळे सर,श्री.शेख सर,श्री.वैद्य सर,श्री.डुकरे सर, श्री.शिवाजी घुंगासे उपस्थित होते.मुख्याध्यापक श्री.गोजरे सरांनी हिंदी विषयाची प्रत्यक्ष तासिका घेऊन आठवणींना उजाळा करुन दिला.अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत करुन सदैव सहकार्य करण्याबाबत कटिबध्द असल्याची ग्वाही माजी विद्यार्थ्यांनी दिली.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व गुरुजनांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..




















