Homeताज्या बातम्यापैठण नाथषष्ठीत बुट पाळण्यात बिघाड; दोन जण जखमी, सुरक्षेचा अभाव उघड

पैठण नाथषष्ठीत बुट पाळण्यात बिघाड; दोन जण जखमी, सुरक्षेचा अभाव उघड

पैठण,दि.१५.( अभिजीत सोनवणे )

नाथषष्ठी यात्रेदरम्यान उभारण्यात आलेल्या बुट पाळण्यात बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाळणा जास्त वेगाने चालवल्याने तो अचानक जोराने फिरू लागला आणि लगेच बंद पडला. त्यामुळे पाळण्यात बसलेल्या नागरिकांचा तोल जाऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

या घटनेत शेवगाव येथील एका पत्रकाराच्या कुटुंबातील दोन जणांना मुका मार लागून किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

घटना घडल्यानंतर पाळणा चालविणारे दोघेही लोकांच्या भीतीने मौत्याचा कुवा (मौत का कुआ) परिसराकडे फरार झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या संबंधित बुट पाळणा बंद ठेवण्यात आला असून काही दलाल त्या ठिकाणी थांबून फरार झालेल्या व्यक्तींची वाट पाहत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.

प्राथमिक पाहणीत असे लक्षात आले की पाळण्याच्या खाली लहान-मोठ्या दगडांचा आधार देण्यात आला होता. पाळणा सुरू झाल्यानंतर हा आधार सटकून संपूर्ण पाळणा रुळावरून खाली घसरला, त्यामुळे पाळण्यात बसलेल्या नागरिकांना दुखापत झाली.

श्री संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी शेवगावहून आलेल्या भाविकांना या घटनेचा धक्का बसला. या परिसरात अजूनही जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की रात पाळणा, बुट पाळणा, झोका पाळणा, ब्रेक डान्स अशा कोणत्याही मनोरंजनाच्या पाळण्यात बसू नये तसेच त्या परिसरात जाणे टाळावे, अन्यथा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

error: Content is protected !!