Homeताज्या बातम्यापॉड टॅक्सी प्रकल्प मॉडेल म्हणून राबवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पॉड टॅक्सी प्रकल्प मॉडेल म्हणून राबवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २५ : अजय मगरे

वांद्रे ते कुर्ला दरम्यानचा पॉड टॅक्सी प्रकल्प हा देशातील पहिला आणि एकमेव प्रकल्प असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाला गती देण्याचेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी आज पॉड टॅक्सी संदर्भात सादरीकरण करण्यात आले. या वेळी अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त, विक्रम कुमार,अश्विन मुदगल, पोलिस महानिरीक्षक अनिल कुंभारे आदी मान्यवर उपस्थित होते.

“परिवहन सेवेचे पुढचे पाऊल म्हणजे पॉड टॅक्सी. वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या बीकेसी परिसरात दररोज लाखो नागरिकांची ये-जा होत असते. या वाढत्या वर्दळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळवून देण्यासाठी पॉड टॅक्सी उपयुक्त ठरेल,” असे शिंदे म्हणाले.

वांद्रे ते कुर्ला या ८ किमी अंतरामध्ये ३३ स्थानके प्रस्तावित असून प्रकल्प सुरू झाल्यानंतर खासगी वाहनधारकांची संख्या घटेल. परिणामी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

error: Content is protected !!