ठाणे, दि. २० :अजय मगरे
समाजसेवेची जाणीव ठेवत प्रज्ञा फाऊंडेशनतर्फे अध्यक्ष तुळशीराम मगरे यांच्या वाढदिवसानिमित्त, श्री सद्गुरू सेवा मंदिर ट्रस्टच्या विवेकानंद बालकाश्रम येथे फळवाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.

ठाण्यातील विवेकानंद बालकाश्रमात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी, सफरचंद, संत्री, डाळिंब अशा विविध ताज्या फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रज्ञा फाऊंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम मगरे स्वतः उपस्थित राहून मुलांशी संवाद साधला, त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रज्ञा फाऊंडेशनचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. “समाजातील वंचित मुलांसाठी काहीतरी करण्याची भावना हीच आमची खरी संपत्ती आहे,” असे सांगून अध्यक्ष तुळशीराम मगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
https://www.facebook.com/share/v/1GpbsP45qi/
या उपक्रमामुळे बालकाश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. उपस्थितांनीही प्रज्ञा फाऊंडेशनच्या या सामाजिक भानातून केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.




















