Homeताज्या बातम्याप्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाज्योतीला १५०० कोटींचा निधी; ओबीसींसाठी ६३ वसतिगृहे उभारणार

मुंबई, दि. ४ : अजय मगरे

राज्यातील इतर मागास वर्गासाठी (ओबीसी) विविध योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाज्योती संस्थेला १५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ६३ वसतिगृहे उभारली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृहात ओबीसी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केला. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजना ओबीसी प्रवर्गातील महामंडळांनाही लागू करण्यात आल्या आहेत. कायद्याच्या चौकटीत राहूनच शासन निर्णय घेतले जातात. त्यामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. शासन प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे.”

मराठवाड्यात निजामशाहीच्या काळातील नोंदींचा आधार घेतल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, कुणबी समाजावर अन्याय होणार नाही. जात प्रमाणपत्र वितरणासाठी स्पष्ट नियमावली तयार असून, वंशावळ समितीमार्फत काटेकोर पडताळणी केली जाणार आहे. खोट्या कागदपत्रांवर कुणालाही प्रमाणपत्र मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आल्याचे सांगितले. या समितीकडे सर्व योजनांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

error: Content is protected !!