Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रात १५,६३१ पोलीस व कारागृह शिपाई पदांची भरती लवकरच....

महाराष्ट्रात १५,६३१ पोलीस व कारागृह शिपाई पदांची भरती लवकरच….

मुंबई, दि.२० : अजय मगरे

राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस कॉन्स्टेबल व कारागृह शिपाई पदांसह एकूण १५,६३१ पदांची भरती करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. याचा जीआर प्रसिध्द झाला आहे.

शासन निर्णयानुसार, ०१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त झालेल्या पदांची भरती केली जाणार आहे. त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल १२,३९९, पोलीस कॉन्स्टेबल चालक २३४, बॅण्डस्मन २५, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल २,३९३ व कारागृह शिपाई ५८० पदांचा समावेश आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता ही सर्व १०० टक्के पदे तत्काळ भरण्याचा निर्णय घेतला असून, भरती प्रक्रिया युनिट स्तरावर पार पाडली जाणार आहे. उमेदवारांना OMR आधारित लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.

२०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा पूर्ण झालेल्या उमेदवारांना यंदाच्या भरती प्रक्रियेत एकदाच अर्ज करण्याची विशेष मुभा देण्यात आली आहे. परीक्षेचे शुल्क खुले प्रवर्गासाठी ४५० रुपये तर मागास प्रवर्गासाठी ३५० रुपये निश्चित करण्यात आले आहे.

भरती प्रक्रियेची जबाबदारी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे देण्यात आली असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!