Homeताज्या बातम्यामहापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १७२ मध्ये भाजपमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा ?

महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १७२ मध्ये भाजपमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा ?

मुंबई, दि.१६ : मंगेश म्हात्रे

दक्षिण मध्य मुंबईतील वार्ड क्रमांक १७२ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत या बालेकिल्ल्यातच भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली असल्याची चर्चा विभागात सुरू आहे.

सायन विभागातील १७२ या वॉर्डातून माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर या दोन टर्म विजयी झालेल्या आहेत. स्थानिक आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन यांना विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भरघोस आघाडी याच वॉर्डातून मिळालेली आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीत भाजपामध्येच शिरवडकरांना आव्हान निर्माण झाले असल्याची चर्चा आहे.

भाजप नेते प्रसाद लाड यांचे समर्थक आशिष साळसकर आणि नुकतेच काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेले राजू ठक्कर हे दोघेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. साळसकरांचा सुशिक्षित आणि स्थानिक असा चेहरा पक्षात पुढे येत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, राजू ठक्कर हे स्थानिक असले तरी भाजपात नवखे असल्यामुळे उमेदवारीची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. साळसकर आणि ठक्कर यांची नावे पुढे आल्याने शिरवाडकर की आणखी कोणाला उमेदवारी मिळणार असे चित्र निर्माण झाले आहे.

वार्ड १७२ मध्ये भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेना किंवा काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून येथे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. शिवसेना मनसे युती झाल्यास मराठी मते मिळवण्यासाठी भाजपला संघर्ष करावा लागू शकतो. भाजपने केलेल्या विकासकामांचा मुद्दा पुन्हा विजय मिळवण्यासाठी मांडला जाणार असला, तरी स्थानिक पातळीवरील अंतर्गत स्पर्धेमुळे निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे. वार्ड १७२ मध्ये भाजप भाकरी फिरवणार का ? की शिरवडकरांचा प्रभाव कायम राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणूक २०१७ प्रमुख उमेदवारांचे एकूण मतदान …

राजश्री शिरवडकर -भाजप -१३,७३१

उपेंद्र दोशी -काँग्रेस -३८७५

प्रकाश वाघधरे-शिवसेना -३७७८

राजेश केणी -मनसे – ४७३

विशाल दुराफे -राष्ट्रवादी काँग्रेस -२१२

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!