Homeताज्या बातम्या*मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस मध्ये बौद्ध भंते विमान्सा यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र...

*मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस मध्ये बौद्ध भंते विमान्सा यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध ~ राज्यमंत्री रामदास आठवले* 

मुंबई दि.२० : अजय मगरे

मुंबई विद्यापीठात पाली विभागाला अनुदानीत करण्यात यावे तसेच पाली भाषा विभागाची स्वतंत्र इमारत मुंबई विद्यापीठातर्फे देण्यात यावी या मागणी करीता भंदत विमान्सा यांनी विद्यापीठाच्या कालीना कॅम्पस येथे उपोषण सुरु केले होते.केंद्रीय मंत्री किरण रिजिजु हे विद्यापीठात आले असता त्यांना शांतपणे निवेदन देण्याकरीत भंदत विमांसा पुढे आले असता विद्यापीठाच्या सुरक्षारक्षांनी भंतेंना धक्काबयकी करुन त्यांचे चिवर फाडण्यात आले. भंते विमान्सा यांना मारहाण करण्यात आली.भंतेंजींवर चुकीचा एफआरआय दाखल करण्यात आला.या सगळ्यांविरोधात भंतेजींनी विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भेट देवून आपले समर्थन दिले.भंतेंना झालेल्या मारहाण प्रकरणाचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांवर एफआरआय दाखल करण्यात यावे. याबाबत मुंबई विद्यापीठ प्रशासनाला आणि पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या प्रकरणी रिपब्लिकन पक्षातर्फे निषेध मोर्चा करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

गेले ३३ दिवस मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅपसच्या प्रवेशद्वारावर पाली विभागाला अनुदानीत करण्यात यावे त्याला स्वतंत्र दर्जा मिळावा व त्यांचे कामकाज चालविण्यासाठी स्वतंत्र इमारत देण्यात यावी,मुंबई विद्यापीठाच्या वस्तीगृहात अनुसुचित जाती जमातीच्या विभागासाठी राखीव जागा ठरवण्यात यावी या मागणीसाठी भदंत विमांसा १४ ऑगस्ट रोजी पासुन मुंबई विद्यापीठात उपोषणाला बसले होते.केंद्रीय मंत्री रिजीजु यांना निवेदन देण्याकरीता गेलेल्या भंतेंना विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांकडुन मारहाण करण्यात आली.या मारहाणीत भंते विवस्त्र झाले होते.ते काही दिवस हॉस्पीटलला दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांना हॉस्पीटलातुन डिस्चार्ज मिळाला होता.बाहेर येऊन भांतेंनी आपली आंदोलन तसेच सुरु ठेवण्याचे ठरविले होते.

दरम्यान आरपीआय तर्फे मुंबई विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे

मुंबई विद्यापीठ प्रशासनाने भंतेवर अत्याचार करणाऱया सुरक्षारक्षकांवर त्वरित एफआयआर दाखल करुन त्यांना विद्यापीठातुन बरखास्त करण्यात यावे,भंतेंजींनी केलेल्या मागण्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करण्यात यावी. भंते विमांसा यांच्यावर दाखल झालेला चुकीचा गुन्हा रद्द करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षा तर्फे करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनआणखी तिव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला5आहे.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,राज्य सरचिटणीस गातम सोनावणे,मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव; अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख ; युवा अध्यक्ष सचिन कासारे; अमित तांबे, संजय खंडागळे; श्रावण मोरे,शशीकला जाधव ,श्याम निकम विद्यार्थी परिषदेचे नेते चंद्रशेखर कांबळे; सचिन बनसोडे आदी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मान्यंवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!