Homeताज्या बातम्याराज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

मुंबई, दि. १६ : अजय मगरे

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि अभिनंदन केले.

या सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, बाबासाहेब पाटील, ॲड. माणिकराव कोकाटे, तसेच मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधीनंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. मुख्य सचिव राजेशकुमार यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केलेली नियुक्ती अधिसूचना वाचून दाखवली.

गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

आचार्य देवव्रत यांचा परिचय :

जन्म : १८ जानेवारी १९५९

वडिलांचे नाव : श्री. लहरी सिंह

शैक्षणिक पात्रता : पदवी व पदव्युत्तर (इतिहास व हिंदी), बी.एड., योगशास्त्र डिप्लोमा, नैसर्गिक चिकित्साशास्त्र व योगिक सायन्समध्ये डॉक्टरेट

सामाजिक व शैक्षणिक कार्य : विविध शैक्षणिक, सामाजिक, कृषी, गोसंवर्धन संस्थांशी कार्यरत

सध्याचे पद : गुजरातचे राज्यपाल (२२ जुलै २०१९ पासून) तसेच २४ विद्यापीठांचे कुलगुरू

अध्यक्षपद : गुजरात विद्यापीठ, एम.एस. युनिव्हर्सिटी, रेड क्रॉस, सैनिक कल्याण मंडळ, स्काऊट्स अँड गाईड्स आदी संस्था

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

error: Content is protected !!