Homeताज्या बातम्या' रे ' नगरातील कामगारांना त्याच ठिकाणी रोजगार दया ..

‘ रे ‘ नगरातील कामगारांना त्याच ठिकाणी रोजगार दया ..

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे निर्देश

मुंबई, दि. ३० ( प्रतिनिधी )

सोलापूर शहरातील ‘रे नगर’ येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामगारांसाठी वसाहती उभारण्यात आल्या असून, या वसाहतींमधील रहिवाशांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याचे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले आहेत.

डॉ. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस आमदार सुभाष देशमुख, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दिपेंद्र सिंह कुशवाह, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव अजित कवडे तसेच सोलापूर गारमेंट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत डॉ. भोयर म्हणाले, “रे नगरमधील रहिवाशांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणीच रोजगार मिळावा, यासाठी सहकारी औद्योगिक वसाहती किंवा समूह विकास योजनेच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत. उद्योग विभागाच्या समन्वयाने हा प्रस्ताव पुढे नेण्यात यावा.”

याशिवाय, रोजगार निर्मितीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. संभाव्य पर्यायांची लवकरात लवकर तपासणी करून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी योग्य तो आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ही योजना प्रत्यक्षात आली, तर रे नगरमधील शेकडो कामगारांना आपले घर आणि रोजगार एकाच ठिकाणी मिळून त्यांच्या जीवनात स्थैर्य येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

error: Content is protected !!