पैठण, दि.१५ : ( प्रतिनिधी )
हर्षी गावातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आज हर्षी गावात दादासाहेब आगळे यांच्या वतीने अनोखे ‘भीक मांगो आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला गेल्या दोन वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने स्वातंत्र्य दिनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांना या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.

या आंदोलनातून जमा झालेली ९१३ रुपये रक्कम थेट ग्रामपंचायतीला देण्यात आली असून त्याची अधिकृत पावतीही ग्रामस्थांनी घेतली आहे. आंदोलनाचे नेतृत्व दादासाहेब अंकुशराव आगळे यांनी केले, तर किसन नगरसह हर्षीतील अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
गावातील खड्डेमय रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.




















