Homeताज्या बातम्याम्हाडात ४० दलालांना प्रवेश बंदी दक्षता विभागाची कठोर कारवाई

म्हाडात ४० दलालांना प्रवेश बंदी दक्षता विभागाची कठोर कारवाई

म्हाडात ४० दलालांना प्रवेश बंदी
दक्षता विभागाची कठोर कारवाई

मुंबई , दि.२६ ( प्रतिनिधी )

म्हाडा मुख्यालयातील विविध मंडळांच्या कार्यालयात दलाली करणाऱ्या तब्बल ४० दलालांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या दलालांना म्हाडाच्या मुख्यालयात प्रवेशबंदी केली आहे. यामुळे नागरिकांची कामे दलालांशिवाय मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वेळेअभावी नागरिकांना आपल्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यास वेळ मिळत नाही. यातच कर्मचारी अधिकारी इतर कामांमध्ये व्यस्त असल्याने नागरिकांना अनेकदा म्हाडात यावे लागते. वेळेची बचत आणि झटपट काम करून घेण्यासाठी काही लोक दलालांची मदत घेतात. शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये अशीच यंत्रणा निर्माण झाली आहे. मात्र घर देण्याचे खोटे आश्वासन देत दलाल नागरिकांची फसवणूक करतात.

फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये काही दलालांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. अशा व्यक्तींना म्हाडा मुख्यालयात प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न काही दलाल करतात. अशा सुमारे ३० दलालांना म्हाडाच्या मुख्य दक्षता आणि सुरक्षा विभागाने काळ्या यादीत टाकले होते.

यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आणखी काही दलालांच्या तक्रारी दक्षता विभागाकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार आणखी १० दलालांना काळ्या यादीत टाकून त्यांना म्हाडा कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सुमारे ४० जणांना म्हाडाच्या मुख्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली असल्याचे, म्हाडाचे मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी विनीत अग्रवाल यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!