Homeताज्या बातम्यामरणानंतरही द्या जीवनदान" – ठाण्यात विद्यार्थ्यांची अवयवदान जनजागृती रॅली

मरणानंतरही द्या जीवनदान” – ठाण्यात विद्यार्थ्यांची अवयवदान जनजागृती रॅली

ठाणे , दि.१३ (अजय मगरे )

आनंद विश्व गुरुकुल नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “मरणानंतरही द्या जीवनदान” हा संदेश ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भव्य रॅली व पथनाट्याचे आयोजन केले. अवयवदानाविषयी समाजात सकारात्मक दृष्टिकोन आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाला सोसायटीचे सचिव व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, खजिनदार अक्षर परसनीस, ब्र. नाथ पाई कॉलेजचे प्राचार्य श्री. अनिल बोरणारे, विश्वस्त जेष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, महाविद्यालयाच्या प्राचार्या संपदा कुलकर्णी, प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. वैदही कोळमकर तसेच सर्व शाखांचे प्राचार्य उपस्थित होते.

मीनाताई ठाकरे नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, सायंकालीन महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवक आणि ए.व्ही.जी. ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. रॅलीसोबत सादर करण्यात आलेल्या लघुनाट्यप्रयोगातून अवयवदानाचे महत्त्व, जीव वाचविण्याची क्षमता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “अवयवदान – अमूल्य दान”, “तुमचे एक पाऊल, दुसऱ्याचे आयुष्य” अशा घोषणांनी शहरातील रस्ते दुमदुमवले. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले तर काहींनी अवयवदानासाठी नोंदणी करण्याची तयारी दर्शविली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मयुरी पेंडसे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!