Homeताज्या बातम्यामुंबईत चोवीस तासांत ढगफुटीसदृश्य पाऊस* *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

मुंबईत चोवीस तासांत ढगफुटीसदृश्य पाऊस* *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा*

*मुंबई महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट*

मुंबई, दि.१९ : अजय मगरे

मुंबईत मागील ६ तासांत २०० मिलामीटर आणि २४ तासांत ३५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे ५२५ पंप कार्यान्वित आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप वाढवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन शहर आणि उपनगरातील पावसाचा आढावा घेतला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मिठी नदीची पाहणी केली तसेच कुर्ला येथील क्रांतीनगर व विक्रोळी पार्कसाईट येथील दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मिठी नदीची पाण्याची पातळी ३.९ मीटरपर्यंत वाढली आहे, त्यामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगरमध्ये पाणी शिरले. येथील जवळपास ३५० लोकांना महापालिकेने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. या ठिकाणी रहिवाशांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईत ६ मुख्य पंपिंग स्टेशन्स आणि १० मिनी पंपिंग स्टेशन्स आणि ५२५ पंप कार्यरत आहेत. ६ तासांत २०० मिलामीटर आणि २४ तासांत ३५० मिलीमीटर पाऊस झाला. कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचले. सगळीकडे यंत्रणा सज्ज असून पालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहेत, असे ते म्हणाले. घाटकोपर, मुंब्रा आणि विक्रोळी पार्कसाईट येथे जिओ नेटिंगचे काम करण्यात आले आहे. दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायम स्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता शहर आणि उपनगरातील पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवावी लागले. यासाठी महापालिका नियोजन करत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा बंद असली तर बेस्टकडून प्रवाशांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!