Homeताज्या बातम्याकोपरगावात ग्रामसेवकाच्या आत्महत्येने खळबळ...

कोपरगावात ग्रामसेवकाच्या आत्महत्येने खळबळ…

काँग्रेस व बहुजन शक्तीची सखोल चौकशीची मागणी….

कोपरगांव, दि. १८ : दीपक साटोटे

कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बाजीराव बाचकर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दि. ८ ऑगस्ट रोजी नेवासा, तामतेळ वस्ती येथील राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मयत ग्रामसेवक यांच्या पत्नी यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत थेट आरोप केला आहे की, कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी व विस्तार अधिकारी बबन वाघमोडे हे त्यांच्या पतीला वारंवार मानसिक व आर्थिक छळ देत होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

फिर्यादीप्रमाणे, मयताच्या दप्तरातून एक आत्महत्यापूर्व चिठ्ठी सापडली असून त्यातही संबंधित अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी टाकलेली आहे. आत्महत्येच्या रात्री बाचकर यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना वारंवार फोन केले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती मोबाईल कॉल डिटेलमधून उघड झाली आहे. शिवाय मृत्यूपूर्वी सहकारी ग्रामसेवकासोबतच्या फोन संभाषणातही त्यांनी अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे स्पष्टपणे सांगितल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर मयताच्या पत्नी व कुटुंबीयांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच कोपरगावातील काँग्रेस किसान सेलचे विजय जाधव आणि बहुजन शक्ती संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून या प्रकरणाची सखोल चौकशी जलदगतीने पूर्ण करून दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!