Homeताज्या बातम्याम्हाडा विद्युत विभागात प्लास्टर कोसळण्याची घटना; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

म्हाडा विद्युत विभागात प्लास्टर कोसळण्याची घटना; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई, दि.२२ : मंगेश म्हात्रे

सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या मुख्यालयाला अवकळा आली आहे. इमारतीच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही म्हाडा मुख्यालयात प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे म्हाडा अधिकारी भयभीत झाले आहेत.

म्हाडाच्या मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या विद्युत विभागात आज अचानक स्लॅबचे प्लास्टर कोसळले. हे प्लास्टर थेट उप अभियंत्यांच्या कॅबिनच्या वरून खाली पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटना घडली त्यावेळी काही कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. मात्र प्लास्टर पडण्याच्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीबाबत म्हाडा प्रशासन करोडो रुपये खर्च करीत असून असे प्रकार होत असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

म्हाडा ही राज्यातील गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकामाशी संबंधित महत्वाची संस्था असून, तिच्या मुख्यालयातच अशा प्रकारच्या घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कर्मचाऱ्यांनी अनेकदा इमारतीच्या दुरुस्ती व देखभालीसाठी मागण्या केल्या असूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत, अशी माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर सुरक्षा उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात, तसेच इमारतीची संरचना व गुणवत्ता तपासून आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा भविष्यात गंभीर दुर्घटना होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!