Homeताज्या बातम्याप्रतीक्षा नगर वार्ड क्र. १७३ : भाजप-शिवसेना शिंदे गटात उमेदवारीवरून रस्सीखेच

प्रतीक्षा नगर वार्ड क्र. १७३ : भाजप-शिवसेना शिंदे गटात उमेदवारीवरून रस्सीखेच

मुंबई, दि.३ : मंगेश म्हात्रे

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर वार्ड क्र. १७३ या जागेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभा आणि विधानसभेतील सूत्रांनुसार ही जागा महायुती घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र भाजपनेही या जागेवर दावा मजबूत करत उमेदवारांची जोरदार चाचपणी सुरू केली आहे.

प्रतीक्षा नगरच्या जागेसाठी भाजपच्या आमदारामधली गटबाजी उघडपणे समोर येत आहे. आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांचा दत्ता केळूसकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रह आहे . तर दुसरी आमदार प्रसाद लाड यांचा विजय पगारे आणि राहुल जाधव यांच्या उमेदवारीसाठी आग्रह असल्याचे समजते. विशेष म्हणजे विजय पगारे यांच्या उमेदवारीसाठी आमदार प्रसाद लाड केंद्र आणि राज्य पातळीवरील आपलं राजकीय वजन वापरू शकतात. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ऑल्वीन दास यांच्या उमेदवारीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. परिणामी, भाजपमध्येच उमेदवारीचा पेच वाढलेला आहे.

वार्डातील गणेशोत्सवाच्या निमित्ताने लागलेल्या बॅनरमधून ही अंतर्गत चढाओढ स्पष्ट दिसून आली आहे. वार्ड महिलांसाठी राखीव झाल्यास आरती निजापकर, विद्या चाळके आणि अंजली ऑल्वीन दास यांची नावे चर्चेत आहेत.

दरम्यान, माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे स्थानिक पातळीवर नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. कांबळे यांना माजी विभागप्रमुख मंगेश सातमकर यांचा पाठिंबा असून, ते पुन्हा निवडणुकीच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे भाजपसमोर पेच अधिकच वाढला आहे.

भाजपने जर महायुतीचा धर्म पाळत वार्ड क्र. १७३ जागा शिवसेना शिंदे गटाला सोडली तर दत्ता केळूसकर बंडखोरीचा मार्ग स्वीकारू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाने उमेदवारीवर जोर वाढल्यामुळे महायुतीत अंतर्गत मतभेद तीव्र झाले आहेत.

प्रतीक्षा नगर वार्ड क्र. १७३ हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानले जाते. त्यामुळे या जागेवरील उमेदवारीचा निर्णय महायुतीच्या एकजुटीची खरी कसोटी ठरणार आहे. पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळून कार्यकर्ते एकदिलाने काम करणार का, की अंतर्गत गटबाजीमुळे निवडणुकीत अडचणी निर्माण होणार? याचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!