Homeताज्या बातम्यामराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड रेल्वेच्या नकाशावर बीड ते अहिल्यानगर रेल्वेगाडीचा शुभारंभ...

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड रेल्वेच्या नकाशावर बीड ते अहिल्यानगर रेल्वेगाडीचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी;

बीड-परळी रेल्वे मार्गाला गती देण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ३ : अजय मगरे

मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे अनेक दशके जुने स्वप्न अखेर साकार होणार आहे. रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर आता रेल्वेच्या नकाशावर दाखल होणार असून येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड ते अहिल्यानगर रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला जाणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गातील अडथळे तातडीने दूर करून गतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

बैठकीला महापारेषणचे महाव्यवस्थापक संजीव कुमार, सार्वजनिक बांधकाम सचिव दशपुते, सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए., उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, रेल्वे अधिकारी विनीत कुमार, पद्मसिंह जाधव, मिलिंद हिरवे, स्वप्नील नीला, प्रशांत भेगडे यांसह जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “बीड-परळी रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणे प्रशासनाने तातडीने निकाली काढावीत. राज्य शासनाचा हिस्सा त्वरित अदा करून अर्थसंकल्पात मंजूर १५० कोटी रुपये तातडीने वितरित करावेत. उर्वरित १५० कोटींची तरतूद पुढील टप्प्यात करावी,” असे निर्देश त्यांनी दिले. तसेच रेल्वेने दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यास सांगितले.

अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्प

एकूण लांबी : २६१.२५ कि.मी.

भूसंपादन : १८२२.१६८ हेक्टर

पूल : रेल्वेखालील १३०, रेल्वेवरील ६५

मोठे पूल : ६५, छोटे पूल : ३०२

प्रकल्पाची एकूण किंमत : ₹४८०५.१७ कोटी

केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा : ५०:५० प्रमाणात प्रत्येकी ₹२४०२.५९ कोटी

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या या रेल्वेसेवेने बीडकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार असून प्रदेशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

error: Content is protected !!