Homeताज्या बातम्याराज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा आणि राज्यगीत गायन अनिवार्य – शिक्षण मंत्री...

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा आणि राज्यगीत गायन अनिवार्य – शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. ९ : अजय मगरे

राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन तसेच राज्यगीत गायन अनिवार्य करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

मंत्रालयात झालेल्या सर्व शिक्षण मंडळांच्या समन्वयक, प्राचार्य आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहविचार बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, उपसचिव तुषार महाजन, तसेच सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल बोर्डांच्या शाळांचे समन्वयक आणि प्राचार्य उपस्थित होते.

भुसे म्हणाले की, सीबीएसई, आयसीएसई आणि केंब्रिज मंडळाच्या शाळांमध्येही दहावीच्या गुणपत्रिकेत मराठी विषयाचा समावेश व्हावा, यासाठी संबंधित मंडळांशी पत्रव्यवहार करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

इंटरनॅशनल बोर्डाच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि मानव्यविद्येतील योगदानाचा समावेश व्हावा, याबाबतही विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भुसे यांनी पुढे सांगितले की, दिव्यांग विद्यार्थी आणि कमी अध्ययन क्षमतेचे विद्यार्थी यांचाही सर्वसमावेशक शिक्षणात सहभाग राहील, यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. तसेच सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

‘शिक्षण हक्क अधिनियम’ अंतर्गत इतर मंडळांच्या शाळांमधील प्रवेशप्रक्रिया आणि शालेय शिक्षण विभागाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी सूचना देत त्यांनी “राष्ट्र प्रथम” ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावी, असेही आवाहन केले.

यावेळी मंत्री भुसे यांनी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. तसेच इतर मंडळांच्या शाळांनी मराठी माध्यम शाळांना मार्गदर्शन आणि सहकार्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
——————————–
विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देण्याची प्रक्रिया गतिमान करावी – भुसे

आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देणे शक्य आहे, यासाठी प्रशासनाने प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
शालेय वेळापत्रक विचारात घेऊन ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण, योग आणि स्वसंरक्षण (कराटे) यांचे प्रशिक्षण द्यावे. कामकाजाचे दिवस आणि उपलब्ध तासिका लक्षात घेऊन याचे नियोजन करावे.” भुसे यांनी पुढे सांगितले की, शालेय शिक्षण विभाग आणि माजी सैनिक कल्याण विभाग यांच्या समन्वयाने या उपक्रमाची शिस्तबद्ध आणि प्रभावी अंमलबजावणी केली जावी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

error: Content is protected !!