Homeताज्या बातम्यापैठण पालिकेचे आरक्षण जाहीर; नगराध्यक्ष..सर्वसाधारण महिला.

पैठण पालिकेचे आरक्षण जाहीर; नगराध्यक्ष..सर्वसाधारण महिला.

भाविंचे स्वप्न भंगले पर्यायी आई, सुन,पत्नी मैदानात उतरणार ?

पैठण, दि.१० : अभिजीत सोनवणे

पैठण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासह २५ नगरसेवकांच्या प्रभागनिहाय आरक्षणाची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या आरक्षणामुळे अनेकांच्या राजकीय स्वप्नांना धक्का बसला असून, आता त्यांच्या पर्यायाने पत्नी, आई किंवा सुन राजकीय रणांगणात उतरतील अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

या निवडणुकीत आमदार विलास भुमरे यांचा राजकीय कस लागणार असून, ‘गड’ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्षांचे दिग्गज नेते रणसज्ज झाले आहेत. पैठण नगरपरिषदेच्या सत्तेचा इतिहास पाहता, आतापर्यंत शिवसेना आणि काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, २०१६ साली थेट जनतेतून झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे सुरज लोळगे यांनी काँग्रेस-शिवसेनेला धक्का देत विजय मिळवला होता.

दीर्घकाळ रखडलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. तीन दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदाचे आरक्षण घोषित झाल्यानंतर बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले. यावेळी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने अनेक जुन्या खेळाडूंचे मनसुबे धुळीस मिळाले. मात्र, आता त्या नेत्यांच्या पत्नींना उमेदवारी देण्याची रणनीती आखली जात असल्याचे दिसून येते.

महायुती-आघाडीत चुरस….

आरक्षण जाहीर होताच महायुती व आघाडीतील नेत्यांनी आपापल्या गोटात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवार प्रभावी ठरेल, कोणाला थांबवायचे आणि कोणाला पुढे करायचे, यावर चर्चा रंगत आहे. प्रत्येक प्रभागातील इच्छुकांनी तिकिटासाठी धावपळ सुरू केली आहे.

चर्चेत असलेल्या महिला दावेदार…

नगराध्यक्षपदासाठी आता महिला उमेदवारांचे नाव आघाडीवर आहे. माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या पत्नी मोहीनी लोळगे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या पत्नी अर्पणा गोर्डे, माजी नगरसेवक किशोर तावरे यांच्या भावजयी सोनाली ताराचंद तावरे, माजी नगरसेवक जितु परदेशी यांच्या पत्नी कोमल परदेशी, तसेच हसोउद्दीन कट्टयारे यांच्या पत्नी नाझीया कट्टयारे या सर्वांच्या नावांची चर्चेने पैठणचे राजकारण चांगलेच रंगात आणले आहे.

आता नगराध्यक्षपदासाठी या महिला दावेदारांपैकी कोणाची बाजी लागते, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, आरक्षणाच्या या फेरीनंतर पैठणच्या राजकारणात “घरातूनच उमेदवार” हा नवीन ट्रेंड दिसू लागला असल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!