Homeताज्या बातम्याकोपरगाव नगरपरिषदेच्या आरक्षणाबाबत हरकत;

कोपरगाव नगरपरिषदेच्या आरक्षणाबाबत हरकत;

प्रभाग क्रमांक ८ मध्ये रोटेशननुसार पुरुष आरक्षणाची अनिल जाधव यांची मागणी

कोपरगाव, दि. ९ : दिलीप गायकवाड

कोपरगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षण यादीनुसार प्रभाग क्रमांक ८ हा अनुसूचित जाती (SC) महिला आरक्षणासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक अनिल जाधव यांनी हरकत नोंदवत सदर प्रभागात रोटेशन तत्त्वानुसार अनुसूचित जाती पुरुष आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

जाधव यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या लेखी अर्जात म्हटले आहे की, सन २०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ अनुसूचित जाती महिला आरक्षणासाठी राखीव होता. त्यामुळे या वेळी रोटेशननुसार पुरुष उमेदवारासाठी आरक्षण असणे आवश्यक होते. परंतु सध्याच्या अधिसूचनेत पुन्हा अनुसूचित जाती महिला आरक्षण देण्यात आले असून, हे महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ मधील कलम ९ नुसार रोटेशन तत्त्वाच्या विरोधात आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

जाधव यांनी या संदर्भातील तपासणी करून रोटेशन तत्त्वानुसार सुधारित आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. तसेच या संदर्भातील प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे.

लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले जाधव यांनी सांगितले की, “समान संधी ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. रोटेशन पद्धतीचे पालन न झाल्यास सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर आघात होईल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतीत कष्ट करणाऱ्या महिलांना आता ‘शेतकरी’ म्हणून मान्यता..

प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू मुंबई : अजय मगरे शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांना आता ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी...

अंबिका नगरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था; नागरिकांचा संताप

ठाणे, दि.१७.( अजय मगरे ) अंबिका नगर नं. २, शिवराय गल्ली येथील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड-पुणे थेट रेल्वेसेवा सुरू 

१७ सप्टेंबरला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; बीडकरांची दीर्घकाळची मागणी पूर्ण   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबरपासून बीड-पुणे दरम्यान पहिली दैनंदिन थेट...

क्यूआर कोडधारक फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा..

जनवादी हॉकर्स सभेची पालिका आयुक्तांकडे मागणी; तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचीही मागणी मुंबई : अजय मगरे मुंबई महापालिकेने २०१४च्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्रे देऊन...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

error: Content is protected !!