Homeताज्या बातम्याम्हाडाच्या पुण्यातील ४,१८६ घरांसाठी अर्जाची संधी आता २० नोव्हेंबरपर्यंत वाढवली..

म्हाडाच्या पुण्यातील ४,१८६ घरांसाठी अर्जाची संधी आता २० नोव्हेंबरपर्यंत वाढवली..

संगणकीय सोडत ११ डिसेंबर रोजी होणार ; नागरिकांना दिलासा

मुंबई, दि. २८ : मंगेश म्हात्रे

म्हाडा पुणे मंडळ तर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनांमधील ४,१८६ सदनिकांच्या विक्री सोडतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत आता २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जदारांना अधिक वेळ मिळावा आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यास सुलभता यावी, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी सांगितले.

सुधारित वेळापत्रकानुसार, प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता काढण्यात येणार आहे. अर्जदारांना २० नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करता येईल, तर २१ नोव्हेंबरपर्यंत RTGS/NEFT द्वारे भरणा करता येईल.

या सोडतीतील घरे चार प्रमुख घटकांमध्ये विभागण्यात आली ती पुढील प्रमाणे म्हाडा गृहनिर्माण योजना (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) : १,६८३ सदनिका प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) : २९९ सदनिका,१५% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (PMRDA हद्द) : ८६४ सदनिका,२०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (PMC, PCMC, PMRDA हद्द) : ३,२२२ सदनिका

अर्जप्रक्रियेकरितानागरिकांनी https://lottery.mhada.gov.in किंवा bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळांवर नोंदणी करावी. तसेच मार्गदर्शन पुस्तिका https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

साकोरे यांनी नागरिकांना आवाहन केले की, म्हाडाने कोणत्याही व्यक्तीला प्रतिनिधी, सल्लागार किंवा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही अशा व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करू नयेत. अन्यथा पुणे मंडळ कोणत्याही फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी हेल्पलाइन क्रमांक ०२२-६९४६८१०० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!