Homeताज्या बातम्याइंदेगाव शिवारातील कालव्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

इंदेगाव शिवारातील कालव्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

पैठण, दि.१४.( अभिजीत सोनवणे )

इंदेगाव ता. पैठण शिवारात शनिवारी (दि. १३ डिसेंबर २०२५) दुपारच्या सुमारास कालव्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

इंदेगाव येथील पोलीस पाटील शिखा रंगनाथ हुबे (वय ३५) यांना दुपारी सुमारे २ वाजता गावातील निवृत्ती सखाराम पोकळे यांनी फोनद्वारे माहिती दिली की उध्दव द्वारकादास नवथर यांच्या शेताजवळील कालव्यात एक पुरुष मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसत आहे. माहिती मिळताच पोलीस पाटील हुबे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली.

यानंतर पैठण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. काही वेळातच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कालव्यातील पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय दवाखाना, पैठण येथे पाठविण्यात आला.

प्राथमिक तपासात सदर व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ७०/२०२५ अन्वये कलम १९४ बी.एन.एस.एस. अंतर्गत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.

मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलीस अधिक तपास करीत असून नागरिकांनी काही माहिती असल्यास पैठण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!