Homeताज्या बातम्याकुतुबखेडा येथे जिल्हा परिषद शाळेत आनंदनगरी मेळावा उत्साहात संपन्न...

कुतुबखेडा येथे जिल्हा परिषद शाळेत आनंदनगरी मेळावा उत्साहात संपन्न…

दावरवाडी,दि.२७ ( अभिजित सोनवणे)

कुतुबखेडा (ता. पैठण) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शनिवारी (दि. २७) आनंदनगरी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नंदकुमार पठाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या आनंदनगरी मेळाव्यात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत खाद्यपदार्थ, विविध खेळणी तसेच शालेय साहित्याची दुकाने थाटली होती. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंना पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पालकांनी भरभरून खरेदी करत आपल्या पाल्यांचे कौतुक केले.

या प्रसंगी बाजार समितीचे संचालक परसराम हजारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष नरवडे, मुख्याध्यापक प्रभाकर गलांडे, बडे बी.बी., कराड बी.पी., कपटी डी.ए. यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच पालक-शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायिक कौशल्य, आत्मविश्वास व आर्थिक व्यवहाराचे प्राथमिक ज्ञान विकसित होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

छायाचित्र:

कुतुबखेडा जि. प. शाळेत आनंदनगरी मेळाव्याचे उद्घाटन करताना रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नंदकुमार पठाडे, सोबत परसराम हजारे, मुख्याध्यापक प्रभाकर गलांडे व पालक.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रहिवाशांच्या विरोधानंतर पीसीएमसी स्थायी समितीने पुनावळे शाळेचा जमीन भाडेपट्टा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

ठाण्यातील सायली जाधवची जिद्दीला सलाम; मोतीबिंदू, आर्थिक संकटावर मात करत SSC मध्ये ९७% गुण

ठाणे, दि.१४.( अजय मगरे ) जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, हे ठाण्यातील सायली जाधव हिने सिद्ध करून...

इंधन बचतीसाठी शिंदेंचा पुढाकार; ईव्ही गाडीचा वापर सुरू

ताफ्यातील वाहनांनाही कात्री; मोदींच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद ठाणे : अजय मगरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे केलेले आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ स्वीकारत...

म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; आता २८ मेपर्यंत अर्जाची संधी

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याची...

error: Content is protected !!