Homeताज्या बातम्याम्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; आता २८ मेपर्यंत अर्जाची संधी

म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; आता २८ मेपर्यंत अर्जाची संधी

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत आता २८ मेपर्यंत करण्यात आली असून, त्यामुळे इच्छुक अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वीही सोडतीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया वाढवल्याने सोडतीतील प्रतिसाद, घरांच्या किंमती आणि उत्पन्न गटांमधील बदल यावर चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई मंडळाने यावेळी विक्रोळी येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १,२३२ घरांपैकी ६१० सदनिका केवळ उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या घरांसाठी स्वतंत्र संकेत क्रमांक तयार करण्यात आले असून, त्यांच्या किंमतीत यापूर्वी जाहीर केलेली ७.५ टक्के कपात कायम ठेवण्यात आली आहे. तसेच प्रत्येक घरासोबत एक वाहनतळ विनामूल्य देण्याचाही निर्णय मंडळाने घेतला आहे.

विक्रोळीतील ६१० घरे आता फक्त HIG साठी

कन्नमवार नगर प्रकल्पातील घरांच्या किंमती साधारणपणे १ कोटी ३९ लाख रुपयांपासून १ कोटी ७९ लाख रुपयांपर्यंत आहेत. बिल्डिंग क्रमांक २ आणि ३ मधील सदनिकांचा उच्च उत्पन्न गटात समावेश करण्यात आला आहे. या बदलामुळे उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

म्हाडा मुंबई मंडळाने मार्च २०२६ मध्ये मुंबईतील विविध भागांतील २,६४० घरांची सोडत जाहीर केली होती. यामध्ये विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वडाळा, पवई, माजगाव आणि इतर भागांतील घरांचा समावेश आहे.

या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी १८५, निम्न उत्पन्न गटासाठी ५८६, मध्यम उत्पन्न गटासाठी ७९८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी ८३१ सदनिका उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत : २८ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत
  • अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत : २९ मे
  • अर्जांची प्राथमिक यादी : १० जून
  • अंतिम यादी प्रसिद्ध : १६ जून
  • सोडतीची तारीख आणि वेळ : नंतर जाहीर होणार
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!