Homeताज्या बातम्याइजिप्तच्या कैरोत घुमला ठाण्याचा मानबिंदू; ‘लोकमत वन वर्ल्ड’ पुरस्काराने डॉ. प्रा. प्रदीप...

इजिप्तच्या कैरोत घुमला ठाण्याचा मानबिंदू; ‘लोकमत वन वर्ल्ड’ पुरस्काराने डॉ. प्रा. प्रदीप ढवळे सन्मानित

कैरो, इजिप्त. दि .६ . प्रतिनिधी

प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या इजिप्तची राजधानी कैरो येथे पार पडलेल्या दिमाखदार आंतरराष्ट्रीय सोहळ्यात ठाणे जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उजळले. साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. प्रा. प्रदीप ढवळे यांना मानाचा ‘लोकमत वन वर्ल्ड’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठाणे जिल्ह्यातून झालेली ही निवड राज्याच्या शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी भूषणावह ठरली आहे. हा सोहळा केवळ सन्मानाचा नसून भारत आणि इजिप्त यांच्यातील दृढ होत चाललेल्या सांस्कृतिक व वैचारिक संबंधांचे प्रतीक ठरला.

नाईल नदीच्या काठी वसलेल्या या ऐतिहासिक शहरात भारतीय गुणवत्तेचा सन्मान होणे, हे दोन्ही देशांमधील शैक्षणिक आणि वैचारिक देवाणघेवाणीला नवी दिशा देणारे मानले जात आहे. भारत–इजिप्त यांच्यातील ऐतिहासिक मैत्रीचे प्रतिबिंब ‘वन वर्ल्ड’ या संकल्पनेतून अधोरेखित झाले.

लोकमत समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यास भारतीय उद्योग, कला, साहित्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी, श्रीमती अमृता फडणवीस, अभिनेत्री सौंदर्या शर्मा यांची उपस्थिती लाभल्याने सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.

पुरस्कार स्वीकारताना भावना व्यक्त करताना डॉ. प्रा. प्रदीप ढवळे म्हणाले,

“हा पुरस्कार मी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तसेच माझ्या सर्व हितचिंतकांना अर्पण करतो. आई-वडील आणि कुटुंबीयांच्या पाठबळामुळेच समाजासाठी कार्य करता आले.”

इजिप्तसारख्या ऐतिहासिक व भव्य शहरात हा सन्मान मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त करत लोकमत समूहाचे मनःपूर्वक आभार मानले.

साहित्यिक मूल्यांचे जतन आणि शैक्षणिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.

इजिप्तच्या भूमीत भारतीय कर्तृत्वाचा झेंडा फडकल्याने ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त. पुणे...

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

दावरवाडी; परिसरात पारा ४१• अंशावर;   उन्हाचा वाढता तडाखा लग्न समारंभांवर भारी,...

ग्रामीण भागात उन्हाचा वाढत्या तडाखामुळे नागरिक उकाड्याने हैराण, दावरवाडी ता.-( अभिजित सोनवणे ) ३०एप्रिल-मे महिन्यात वाढलेल्या प्रखर उन्हामुळे जनजीवन अक्षरक्ष; विस्कळीत, हैराण झाले आहे. तापमानाचा पारा...

नांदर: येथील अक्षय राऊत यांची रोजगार सेवक पदी निवड:

दावरवाडी ता ३०(अभिजित सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अक्षय राऊत वय(२०) यांची नांदर ग्रामपंचायत येथे रोजगार दि (२६) रोजी रविवारी सकाळी नऊ वाजता...

गॅस गळतीनंतर रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास, फक्त एकाला ऑक्सिजनच्या आधाराची गरज: डॉक्टर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या प्लॉटवरील पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूच्या गळतीमुळे सायबानगरमधील अनेक रहिवाशांना गुरुवारी पहाटे मळमळणाऱ्या दुर्गंधीमुळे जाग आली...

error: Content is protected !!