ठाणे,दि.१७. ( अजय मगरे )
स्थापना २०२४ असलेल्या संदीप मित्र मंडळ यांच्या वतीने दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत माता रमाबाई आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अंबिका नगर नं. २ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वागळे इस्टेट रोड क्र. १६, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या समवेत खासदार श्रीकांत शिंदे (कल्याण लोकसभा), खासदार नरेश म्हस्के (ठाणे लोकसभा), आमदार (विधान परिषद) रविंद्र फाटक तसेच स्थानिक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक एकोपा, राष्ट्रभक्ती आणि समतेचा संदेश देणाऱ्या या संयुक्त जयंती उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि नागरिकांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे निमंत्रक पांडूरंग कदम, के.पी. (मुन्नू) तिवारी, यश (सोन्या) कांबळे, गुरुनाथ मांडवकर व राजू मगरे यांनी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून जयंती उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.




















