Homeताज्या बातम्याभाजपच्या शिल्पा केळुसकरांची दोन महत्त्वाच्या समित्यांवर वर्णी

भाजपच्या शिल्पा केळुसकरांची दोन महत्त्वाच्या समित्यांवर वर्णी

मुंबई महापालिकेत सायन-कोळीवाड्याचं वर्चस्व!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या विविध समित्यांच्या भाजपने आपल्या शिलेदारांना ताकद देण्यास सुरुवात केली असून, सायन-कोळीवाडा विधानसभा क्षेत्राचे वर्चस्व महापालिकेत स्पष्टपणे दिसून येत आहे.

वॉर्ड क्रमांक १७३ च्या भाजप नगरसेविका शिल्पा दत्ताराम केळुसकर यांची महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थापत्य समिती (शहर) आणि महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड झाली आहे. शहराच्या विकासकामात महत्त्वाची भूमिका असलेल्या स्थापत्य समितीत आणि महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बाल कल्याण समितीत केळुसकर यांची वर्णी लागली आहे.

राजेश्री शिरवडकर ‘शिक्षण समिती’; तृष्णा विश्वासरावांना ‘बेस्ट’ संधी

दरम्यान, सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातून वार्ड क्रमांक 172 च्या भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांची मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच, शिवसेना (शिंदे गट) वार्ड क्रमांक 180 च्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांची बेस्ट समिती सदस्यपदी निवड झाली आहे.

सायन-कोळीवाड्याला ‘झुकते माप’

या नियुक्त्यांकडे बारकाईने पाहिल्यास मुंबई महापालिकेत सायन-कोळीवाडा विधानसभा क्षेत्राचा दबदबा वाढल्याचे स्पष्ट होत आहे. शिक्षण, बेस्ट आणि स्थापत्य यांसारख्या तिन्ही महत्त्वाच्या विभाग एकाच विधानसभा क्षेत्रातील नगरसेविकांच्या हाती गेल्याने राजकीय वर्तुळात याचीच चर्चा रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्त्यांना थेट OMCs कडून खरेदी करण्यास सांगतो, किरकोळ पंप नाही....

इंधन केंद्रांसाठी, वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाते पुणे : शुक्रवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की मोठ्या प्रमाणात इंधनाची...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले : एकनाथ शिंदे

ठाणे : अजय मगरे ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने महायुतीच्या विजयाचे फाटक उघडले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले....

पीएमसी संचलित वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाच्या तक्रारींबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत

पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (बीएव्हीएमसी) पुणे : पीएमसी संचालित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (बीएव्हीएमसी) च्या किमान चार महिला...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप महिलेने केल्यानंतर पुणे...

एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

error: Content is protected !!