एफ दक्षिण-एफ उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदावर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा; मानसी सातमकर ८ विरुद्ध ७ मतांनी विजयी
मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मानसी मंगेश सातमकर यांनी थरारक लढतीत विजय मिळवला. सातमकर यांना एकूण ८ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गटाच्या श्रद्धा श्रीधर जाधव यांना ७ मते मिळाली. त्यामुळे अवघ्या एका मताने सातमकर यांनी अध्यक्षपद पटकावले.
या निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे सदस्य अनुपस्थित राहिल्याने मतदानाच्या समीकरणांवर त्याचा परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
प्रभाग समितीतील पक्षीय बलाबल
भाजप – 5
शिवसेना ठाकरे गट – 6
शिवसेना शिंदे गट – 3
काँग्रेस – 1-
मनसे – 1
समाजवादी पक्ष – 1
अवघ्या एका मताने झालेल्या या चुरशीच्या निवडणुकीने प्रभाग समितीच्या राजकारणात चांगलाच रंग भरला आहे.
या निवडणुकीचे कामकाज महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून पार पाडले. यावेळी परिमंडळ २ चे उपआयुक्त प्रशांत सपकाळे, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अरुण क्षीरसागर, एफ दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त वृषाली इंगुले तसेच महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे उपस्थित होते.




















