Homeताज्या बातम्यासायनच्या जी.टी.बी. नगर पुनर्विकासाला गती; ६३५ चौरस फुटांची घरे, ४८ मजली टॉवर्स...

सायनच्या जी.टी.बी. नगर पुनर्विकासाला गती; ६३५ चौरस फुटांची घरे, ४८ मजली टॉवर्स उभारणार

मुंबई : मंगेश म्हात्रे

सायनमधील गुरु तेग बहादुर नगर (जी.टी.बी. नगर) समूह पुनर्विकास प्रकल्पाला अखेर वेग मिळाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे येथील रहिवाशांना ६३५ चौरस फुटांची आधुनिक आणि सुसज्ज घरे मिळणार असून प्रकल्पाचा विकास किस्टोन रिअल्टर्स (रुस्तुमजी समूह) यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.

म्हाडा आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी यांच्यात त्रिपक्षीय विकास करार पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा करार करण्यात आला.

सुमारे ११.२० एकर जागेवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात ३९ ते ४८ मजली तीन आधुनिक निवासी टॉवर्स उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पातून सुमारे १२०० लाभार्थ्यांना विनामूल्य ६३५ चौरस फुटांची सदनिका मिळणार आहे. यासोबतच गेटेड कम्युनिटी, बहुमजली पार्किंग, हिरवळ, तसेच आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

बांधकामास प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पात्र रहिवाशांना दरमहा २० हजार रुपये भाडे अनुदान दिले जाणार आहे. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षे इमारतींची देखभाल आणि व्यवस्थापनाची जबाबदारी म्हाडा पार पाडणार असल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे २०२० मध्ये येथील इमारती धोकादायक घोषित झाल्यानंतर त्या पाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर रहिवाशांच्या मागणीनुसार हा पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधांमुळे जी.टी.बी. नगर पुनर्विकास प्रकल्प भविष्यातील पुनर्विकास योजनांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!