जी उत्तर प्रभाग समितीवर मनसेचा झेंडा
मुंबई : मंगेश म्हात्रे
मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यशवंत किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जोसेफ कोळी यांनी अर्ज मागे घेतल्याने किल्लेदार यांची निवड निश्चित झाली.
या अध्यक्षपदासाठी जोसेफ कोळी आणि यशवंत किल्लेदार यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या निर्धारित वेळेत कोळी यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे किल्लेदार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
जी उत्तर विभाग कार्यालयात ही निवडणूक पार पडली. उपमहापौर संजय घाडी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून निवडणुकीचे कामकाज पाहिले. यावेळी उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त विनायक विसपुते, महानगरपालिका उप सचिव प्रियांका देसाई आदी अधिकारी उपस्थित होते.




















