Homeताज्या बातम्याअनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी व्यापक लढ्याची गरज – प्रा. रामचंद्र भरांडे लोकस्वराज...

अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी व्यापक लढ्याची गरज – प्रा. रामचंद्र भरांडे लोकस्वराज आंदोलन वतीने दि.२७ एप्रिल २०२६,मुंबई आझाद मैदान येथे होणार आंदोलन. 

शिर्डी,दि.११.( दिलीप गायकवाड )

अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन टाळाटाळ करत असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी व्यापक लढा उभारण्याची गरज असल्याचे मत लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांनी व्यक्त केले.

लोकस्वराज्य आंदोलन व समविचारी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीस अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने २७ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक घेण्यात आली.

यावेळी बोलताना प्रा. भरांडे म्हणाले की, वंचित घटकांना न्याय मिळावा म्हणून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाचे स्वप्न पाहिले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करून ते प्रत्यक्षात आणले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांतही अनेक समाजघटक आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अनेक राज्यांनी त्याची अंमलबजावणीही केली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमून दोन वेळा मुदतवाढ देत निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब केला असल्याची टीका त्यांनी केली.

येत्या २७ एप्रिल रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या मोर्चात एक लाख समाजबांधव सहभागी झाल्यास शासनाला आरक्षणाचे वर्गीकरण करावेच लागेल. निर्णय जाहीर होईपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

बैठकीस राजेंद्र त्रिभुवन, रामभाऊ पिंगळे, भाऊसाहेब आव्हाड, भागचंद नवगिरे, सागर भोंडगे, अर्जुन मरसाळे, संजय बोरुडे, संजय शिर्डीकर, भाऊराव साळवे, रवी कांबळे, अ‍ॅड. सौ. सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. नितीन पोळ यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!