Homeताज्या बातम्याघोडबंदर येथे राज्यातील सर्वात मोठे ‘आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ उभारणार

घोडबंदर येथे राज्यातील सर्वात मोठे ‘आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ उभारणार

ठाणे,दि.४ ( अजय मगरे )

शहराच्या सांस्कृतिक विकासाला नवे आयाम देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प घोडबंदर रोडवरील वाघबीळ परिसरात साकार होणार आहे. ‘निरुपणकार तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ असे या भव्य प्रकल्पाचे नाव असून, हे नाट्यगृह राज्यातील सर्वात मोठ्यांपैकी एक ठरणार आहे. या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

सुमारे २५०० प्रेक्षक क्षमतेचे हे नाट्यगृह ७३०० चौ.मी. क्षेत्रफळावर उभारले जाणार आहे. मुख्य सभागृहासोबतच बाल्कनी व्यवस्था, भव्य रंगमंच आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणे शक्य होणार आहे.

प्रेक्षकांच्या सोयीसाठी आधुनिक आसनव्यवस्था, लिफ्ट, एस्कलेटर, स्वच्छतागृहे तसेच दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कलाकारांसाठी स्वतंत्र बॅकस्टेज सुविधा आणि मोठा बँक्वेट हॉल देखील उभारण्यात येणार आहे.

नाट्यगृहाच्या परिसरात प्रशस्त प्लाझा, आकर्षक उद्यान आणि लाईव्ह कार्यक्रमांसाठी मोकळी जागा विकसित करण्यात येणार आहे. यासोबतच तीन मजली वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रकल्पाच्या पुढील नियोजनासाठी लवकरच रंगकर्मी, दिग्दर्शक आणि कलाकारांची बैठक घेण्यात येणार असून, त्यांच्या सूचनांनुसार कामाला गती दिली जाणार आहे.

एकंदरीतच, वाघबीळ येथे उभारले जाणारे ‘आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ ठाणे शहराच्या सांस्कृतिक वैभवात भरीव भर घालणारे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!