Homeताज्या बातम्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिवाजी पार्कमध्ये भव्य ड्रोन शो; दादर परिसरात वाहतुकीत...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिवाजी पार्कमध्ये भव्य ड्रोन शो; दादर परिसरात वाहतुकीत मोठे बदल

आज संध्याकाळी ५ ते रात्री १० दरम्यान काही मार्ग बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

मुंबई | मंगेश म्हात्रे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर रविवारी (१० मे २०२६) भव्य ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी १३ एप्रिल रोजी होणारा हा कार्यक्रम आशा भोसले यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवट्यामुळे रद्द करण्यात आला होता. आता नव्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असून, त्यानिमित्त मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत शिवाजी पार्क परिसरातील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, तर काही मार्गांवर एकमार्गी वाहतूक लागू करण्यात येणार आहे.

दक्षिण आणि उत्तर केळूस्कर मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असून, केवळ आमंत्रित वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच एस. के. बोले रोड हा सिद्धीविनायक मंदिर जंक्शन ते पोर्तुगीज चर्च जंक्शनदरम्यान एकमार्गी करण्यात आला आहे.

याशिवाय स्वातंत्रवीर सावरकर मार्ग सिद्धीविनायक जंक्शन ते यस बँक जंक्शनदरम्यान वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एस. के. बोले रोड, गोखले रोड, गडकरी जंक्शन आणि एल. जे. रोडमार्गे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एस. व्ही. एस. रोड, पांडुरंग नाईक मार्ग, राजा बडे चौक आणि गोखले रोडमार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, केळूस्कर मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग आणि एन. सी. केळकर मार्गावरील काही भागांत नो-पार्किंग लागू करण्यात आले आहे. पोलीस, पीडब्ल्यूडी आणि इतर शासकीय विभागांच्या वाहनांसाठी स्वातंत्रवीर सावरकर स्मारक, वनिता समाज हॉल, महात्मा गांधी जलतरण तलाव आणि कोहिनूर सार्वजनिक वाहनतळ येथे विशेष पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे तसेच गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

विक्रोळीतील ६१० घरे आता फक्त HIG साठी; म्हाडाची अर्ज प्रक्रियेला २८ मेपर्यंत मुदतवाढ

म्हाडाचा मोठा निर्णय; अर्जाची मुदतही वाढवली मुंबई : मंगेश म्हात्रे मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर...

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीने पकड घट्ट केली, राष्ट्रवादीच्या...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

नक्षलग्रस्त भागात २४ वर्षे आरोग्यसेवेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला सोयम कोण? राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय...

नवी दिल्ली महाराष्ट्रातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात गेली तब्बल २४ वर्षे निस्वार्थ आरोग्यसेवा देणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम या अचानक राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्या आहेत....

खासगी बसवाल्यांची मनमानी आता बंद? अवैध ट्रॅव्हल ॲप्स विरोधात सरकारचा मोठा ‘ॲक्शन प्लॅन’

तिकीट दरांची लूट थांबवा; परिवहन मंत्र्यांचा थेट आदेश मुंबई -मंगेश म्हात्रे प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून आर्थिक लूट करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर राज्य सरकारने आता...

error: Content is protected !!