Homeताज्या बातम्यासायनच्या प्रतीक्षा नगर बस डेपोमध्ये बेस्टच्या बसला भीषण आग; कर्मचाऱ्यांनी शेवटच्या क्षणी...

सायनच्या प्रतीक्षा नगर बस डेपोमध्ये बेस्टच्या बसला भीषण आग; कर्मचाऱ्यांनी शेवटच्या क्षणी काय केलं?

मुंबई -मंगेश म्हात्रे

मुंबईतील सायन परिसरातील प्रतीक्षा नगर बेस्ट डेपोमध्ये रविवारी (24 मे) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रात्री साधारण 11.30 वाजताच्या दरम्यान डेपोमध्ये उभी असलेल्या एका खाजगी बसमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले.

डेपोमध्ये एकामागोमाग एक बस उभ्या असल्याने काही काळासाठी मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली होती. आग लागलेल्या बसच्या अगदी शेजारी सहा बस पार्किंगमध्ये उभ्या होत्या. आगीच्या ज्वाळा वेगाने पसरत असल्याचे पाहून डेपोतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने धाव घेतली आणि जीव धोक्यात घालून त्या सहा बस सुरक्षित स्थळी हलवल्या.

कर्मचाऱ्यांच्या या धाडसी आणि तत्पर कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा काही मिनिटांतच संपूर्ण डेपो आगीच्या विळख्यात सापडला असता आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असते, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संबंधित बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेनंतर डेपोतील सुरक्षाव्यवस्था, खाजगी बसांची देखभाल आणि अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या संख्याबळावर, तर भाजपने पुणे एमएलसी जागेवर दावा ठोकण्याच्या अलीकडच्या हालचालींवर

माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते पुणे : पुणे विधानपरिषद (एमएलसी) सदस्यपदावरून महायुती मित्रपक्ष,...

पुण्यात संचारबंदी लागू नाही, व्हायरल दाव्यांच्या दरम्यान पोलिसांनी स्पष्टीकरण दिले. पुणे बातम्या

पुण्यात संचारबंदी लागू नाही, व्हायरल दाव्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे स्पष्टीकरण (प्रतिनिधी प्रतिमा) पुणे: शहरात 14 दिवसांचा कर्फ्यू लागू करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या मीडिया आणि...

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

error: Content is protected !!