Homeताज्या बातम्याआझाद मैदानावर असंघटित कामगारांचा आक्रोश; हजारोंचा ठिय्या आंदोलनात सहभाग

आझाद मैदानावर असंघटित कामगारांचा आक्रोश; हजारोंचा ठिय्या आंदोलनात सहभाग

मुंबई : अजय मगरे

विविध असंघटित क्षेत्रांतील कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सिटूच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर सुरू असलेल्या आक्रोश ठिय्या आंदोलनाला मंगळवारी मोठा प्रतिसाद मिळाला. बांधकाम, घरेलू, बिडी, ऊसतोड, यंत्रमाग आदी क्षेत्रांतील हजारो कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सरचिटणीस एम. एच. शेख, के. आर. रघु, डॉ. विवेक मॉन्टेरो, शुभा शमीम, भूषण पाटील, उज्वला पडलवार, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, नसीमा शेख, आरमायटी इराणी, किरण मोघे, आबासाहेब चौगुले आणि युसुफ मेजर यांनी केले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांवर त्यांनी जोरदार टीका केली.

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व अर्जुन सेनगुप्ता समितीच्या सदस्या डॉ. सुमंगला दामोदरन यांनी आंदोलनाला मार्गदर्शन करताना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने विशेष आर्थिक तरतूद करणे आवश्यक असल्याचे सांगितले. देशातील सुमारे ९० टक्के कामगार असंघटित क्षेत्रात कार्यरत असून आर्थिक विकासात त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. डीवायएफआयचे राज्याध्यक्ष मोहन जाधव, कॉ. शैलेंद्र कांबळे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवित बेरोजगारी वाढविणाऱ्या धोरणांवर टीका केली.

क्रांतिकारी शाहीर संभाजी भगत यांनी आपल्या झंझावाती गीतांद्वारे कामगारांना संबोधित केले. समाजात जात-धर्माच्या नावावर फूट पाडून सत्तेचे राजकारण करणाऱ्यांवर त्यांनी गीतांमधून प्रहार केला.

दरम्यान, कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी सिटूच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले. डॉ. डी. एल. कराड, एम. एच. शेख, आमदार विनोद निकोले, डॉ. विवेक मॉन्टेरो, आरमायटी इराणी, किरण मोघे, भरमा कांबळे आणि आबासाहेब चौगुले यांचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर करण्यात आले.

कामगारांना कायम नोकरी, किमान ३० हजार रुपये वेतन, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय, पेन्शन, क्षेत्रनिहाय कल्याणकारी मंडळांची स्थापना, चार श्रमसंहितांची अंमलबजावणी रद्द करणे, महागाई नियंत्रणात आणणे तसेच योजना कर्मचाऱ्यांना कायम करून त्यांना सामाजिक सुरक्षा लाभ देणे या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!