Homeताज्या बातम्या5 वर्षं ‘अपघात’ म्हणून दडलेलं मृत्यूचं गूढ अखेर उकललं!

5 वर्षं ‘अपघात’ म्हणून दडलेलं मृत्यूचं गूढ अखेर उकललं!

मित्रांनीच रचला होता थरारक कट; हत्या करून मृतदेहासह दुचाकी फोंडा घाटात फेकली

पैशांच्या वादातून मित्राचा काटा; अपघाताचा बनाव करणारे आरोपी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

मुंबई : प्रतिनिधी

सिंधुदुर्गातील फोंडा घाटात पाच वर्षांपूर्वी घडलेला एक ‘साधा अपघात’… दरीत पडलेली दुचाकी… बाजूलाच आढळलेला मृतदेह… आणि सर्वांना वाटलं, हा दुर्दैवी अपघात! मात्र या अपघाताच्या आड दडलेलं होतं एक भयानक सत्य. तब्बल पाच वर्षांनंतर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा थरारक पर्दाफाश करत हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचे उघड केले आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये अशफाक मुलानी उर्फ निहाल याला त्याच्याच ओळखीच्या व्यक्तींनी कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. मात्र ही भेट शेवटची ठरेल, याची कल्पनाही त्याला नव्हती. पैशांच्या देवाणघेवाणीवरून सुरू झालेला वाद टोकाला गेला आणि मित्रांनीच त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अशफाकचा मृत्यू झाला.

मित्राचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी घाबरले… पण पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून त्यांनी आणखी मोठा डाव आखला. खुनाचे पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह आणि दुचाकी घेऊन ते थेट फोंडा घाटात पोहोचले. त्यानंतर मृतदेहासह मोटारसायकल खोल दरीत फेकून हा संपूर्ण प्रकार अपघात असल्याचा बनाव तयार करण्यात आला.

दरीत आढळलेली दुचाकी आणि मृतदेह पाहून सुरुवातीला हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. वर्षामागून वर्षे गेली… आरोपींना वाटू लागलं की त्यांचा कट कायमचा दडपला गेला आहे. मात्र गुन्हा कितीही हुशारीने लपवला तरी सत्य कधी ना कधी समोर येतंच, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

घाटकोपर गुन्हे शाखा कक्ष-७ च्या पथकाला मिळालेल्या एका गोपनीय माहितीने या पाच वर्षं जुन्या प्रकरणाला नवं वळण दिलं. पोलिसांनी पुन्हा तपासाची चक्रे फिरवली. बारकाईने चौकशी करत एक-एक धागा जोडला आणि अखेर ‘अपघाताच्या मुखवट्यामागे’ लपलेला खुनाचा कट उघडकीस आणला.

या प्रकरणी मनोज भंडगे, सुरेंद्र सोनवडेकर, अतिश मोरे आणि ऋतुराज शेट्टी यांना अटक करण्यात आली असून चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या कटात आणखी साथीदारांचा सहभाग असल्याचे उघड झाले असून अमित राऊत आणि मनोज भंडारी यांचा शोध पोलीस घेत आहेत.

पाच वर्षं अपघात म्हणून बंद पडलेलं प्रकरण… एका गोपनीय माहितीने पुन्हा उघडलं आणि मित्रांनीच मित्रासाठी रचलेला मृत्यूचा सापळा अखेर जगासमोर आला. गुन्हे शाखा कक्ष-७ ने ‘अपघाताचा बनाव’ फोडत पाच वर्षं दडलेलं खुनाचं गूढ अखेर उकललं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!